महादरबार न्यूज नेटवर्क -
सकल धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी माळशिरस तालुक्यातील सर्व तमाम धनगर बांधव सर्व पक्षांच्या वतीने लाखोंच्या संख्येने भव्य दिव्य अशी वीस हजार मोटरसायकलची रॅली निघणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
रविवार दिनांक ३ डिसेंबर रोजी माळशिरस अहिल्यादेवी स्मारक येथून सुरुवात होणार असून पुरंदावडे सदाशिवनगर नातेपुते, नातेपुते फोंडशिरस अकलूज खंडाळी वेळापूर खडूस आणि माळशिरस येथे शेवट होऊन तालुक्यातील जेष्ठ नेते समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व महिला आणि पुरुष तसेच मुलांनीही एक दिवस समाजासाठी सर्व कामधंदा सोडून सामील व्हावे असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments