महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
सोलापूर-पुणे महामार्गावर यवत गावच्या हद्दीत एसी ची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला (दि२४)ला पहाटे २:२० वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंटेनरच्या केबिनमध्ये झोपलेल्या क्लीनरचा होरपळून मृत्यू झाला. प्रिन्स राजा सरूप परमाल (वय २३ वर्षे रा. डोंगरकला ललीतपुर ता. पाली जि. ललीतपुर राज्य उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या क्लीनरचे नाव आहे. तर ५० लाख रुपयांपेक्षा अधिक एसीचे आणि कंटेनरचे नुकसान झाले आहे.
घटने प्रकरणी यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर क्रमांक एचआर ३८ एडी ६४२६ वरील चालक आकिलखान फखरूददीन खान हा चेन्नई येथुन ब्लु स्टार कंपनीचे एसीचे१६८नग भरून भिंवडी मुंबई येथे खाली करण्यासाठी जात होते. कंटेनर मध्यरात्रीच्या सुमारास यवत गावच्या हद्दीत गणेश साळुंखे यांच्या हॉटेलसमोर आला असता अचानक चालू कंटेनरच्या कॅबिनने वायरिंगमुळे शॉर्टसर्किट होऊन पेट घेतला. चालकाने कंटनेरचा वेग कमी करून कंटेनरचे कॅबिनमध्ये क्लीनर प्रिन्सराजा अंगावर पांघरूण घेऊन झोपलेला होता. त्यावेळी चालकाने त्यास उठविण्याचा प्रयत्न केला असता क्लीनर न उठल्यामुळे कंटेनरची कॅबिन पुर्णपणे जळुन गेली तेव्हा कॅबिनमधील क्लीनरचा जळून मृत्यू झाला. आग विझविण्यासाठी यवत येथील सदगुरु वॉटर सप्लायरचे राहुल बनसुडे यांचा टॅंकर तसेच दौंड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या बंबानी लागलेली आग चार तासानंतर आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र आगीत एसी आणि कंटेनर यांचे जवळपास ५० लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले. यवत पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही लेनवरची वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवली होती.
0 Comments