महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते पोलीस ठाणे परिसरात चोरीस गेलेले व गहाळ झालेले वेगवेगळया कंपणीचे एकूण १६ मोबाईल ज्याची किंमत ३,२०,००० किमतीचे मूळ फिर्यादीस परत देण्यात आलेले आहे.
सदर मोबाईल जप्त करण्यासाठी पोकों/ ५३२ रणजित मदने = नातेपुते पोलीस ठाणे, पोकों = रतन जाधव सायबर पोलीस ठाणे सोलापूर यांनी तांत्रिक विश्लेशन करुन वरील प्रमाणे मोबाईल जप्त केलेले आहेत.
मा. श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सो। सोलापुर ग्रा., मा. श्री प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा. ,मा.श्री. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सो अकलुज विभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे भव्य प्रांगणात समारंभपूर्वक वरिल सर्व गुन्हयातील फिर्यादी यांना बोलावुन घेवुन त्यांना मोबाईल परत करण्यात आले.
त्यावेळी नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे , पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे, पोहेकों/राहूल रूपनवर , पोहेकों राहुल रणनवरे, पोना राकेश लोहार, पोना/अमोल वाघमोडे, पोकॉ रणजित मदने, पोकों सोमनाय मोहिते, पोकॉ रमेश बोराटे, पोकों रमेश कर्चे, मपोकों नेहा बोंदर मपोकों/वैशाली शेंडे यांचे आभार मानले सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे ,हददीतील नागरीकांकडुन नातेपुते पोलीस ठाणेच कौतुक करण्यात येत असुन नागरिकांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments