Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat बुरंबाड प्रीमिअर लीग २०२५ चे आयोजन

आ. शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
येथील बुरंबाड कातळ स्टॉप मैदानावर बुरंबाड प्रीमिअर लीग २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला कोकणचे लोकप्रिय आ. शेखर निकम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
   
जय हनुमान बुरंबाड क्रिकेट क्लब मार्फत बुरंबाड प्रीमिअर लीग २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दि. २५ व रविवार दि. २६ अशी दोन दिवस चालणार असून ती लीग स्वरूपाची स्पर्धा असणार आहे. हि स्पर्धा दोन्ही दिवस रात्रीच्या वेळेस खेळविण्यात येणार आहेत. सदर अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये ६ संघांचा समावेश राहणार असून प्रत्येक संघाच्या ५ मॅचेस होणार आहेत.
   
दरम्यान, सदर स्पर्धेमध्ये आकर्षक बक्षीसांची खैरात केली असून पहिले बक्षीस रोख रू. २२०००/- व चषक, दुसरे बक्षीस रोख रू. १५०००/- व चषक, तिसरे बक्षीस रोख रू. ४०००/- व चषक तर चौथे बक्षीस रोख रू. ४०००/- व चषक असणार आहे. तसेच बेस्ट बॉलर ट्रॉफी, बेस्ट बॅट्समन ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आणि प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देखील असणार आहे.
     
अशा या भव्य क्रिकेट स्पर्धेचे स्वरूप असून याची शोभा वाढविण्याकरिता क्रीडा प्रेमी आणि चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता युवा नेतृत्व अनिरुद्ध शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा कार्याध्यक्ष सुशील भायजे, आमदार शेखर निकम यांचे स्विय सहाय्यक अमित सुर्वे,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस समीर लोटणकर, कळंबुशीचे सामाजिक कार्यकर्ते अक्षय चव्हाण, अमोल नेटके यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
   
तरी या बुरंबाड प्रीमिअर लीग २०२५ निमित्त क्रिकेट प्रेमिंना आनंदाची पर्वणी मिळणार असून क्रिकेट शौकीनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन जय हनुमान बुरंबाड क्रिकेट क्लब मार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments