महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते शहरामध्ये मेन रोडच्या मध्यभागी गेले काही महिन्यापासून विद्युत खांब लावण्यात आले आहेत परंतु त्या खांबावर लाईट चालू नसल्यामुळे येना जाणाऱ्या नागरिक व वाहन चालकांना हा त्रास होत आहे कारण रोडच्या मध्यभागी लाईट नसल्यामुळे रोड वरती अंधार पडत आहे. त्यामुळे वाहन चालक यांना व नागरिकांना त्रास होत आहेत.
तसेच भविष्यात रोडवर दुर्घटना होण्याची शक्यता आहे .तरी संबंधित मुख्याधिकारी यांनी जनहितार्थ प्रश्न दखल गांभीर्याने घेऊन तात्काळ रोडवरील विद्युत खांबावरील लाईट चालू करण्यात यावे असे निवेदन अण्णा सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक
अध्यक्ष श्री अमित भिंगारदिवे, श्री मोहन रुपनवर, श्री इरफान नदाफ इत्यादींच्या उपस्थितीत देण्यात आले.
0 Comments