महादरबार न्यूज नेटवर्क -
गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामूळे माळशिरस, फलटण बारामती परीसरातील ओढे,नाले, तूडूंब भरून वाहू लागली असून परीसरातील शेतांना तळ्यांचे स्वरूप आले आहे. ही ढगफूटी आहे कि अतिवृष्ठि असा प्रश्व सर्वसामान्य नागरीकासह शेतकरी विचारत आहेत.
नीरा नदीपात्र धोक्याच्या पातळीवर..
सध्या नीरा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत असून चोख पोलिस बदोबस्त ठेवण्यात आला असून कोणीही नीरा नदीच्या पात्रात जाण्याचे धाडस करू नये. नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, काही अडचण आल्यास नातेपुते पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन नातेपुते पोलिस स्टेशनचे सपोनि महारुद्र परजणे यांनी केले आहे.
अवकाळी पावसाने रौद्ररूप धारण केले असुन परीसरातील पाणी निरा नदीला आल्यामूळे . नीरा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नीरा नदीवरील चिखली, कुरबावी, पळसमंडळ, व कळंबोली, चाकोरे येथील बंधाऱ्यावरुन पाणी वाहत असल्यामूळे. नातेपुते —वालचंदनगर ,तसेच नातेपुते —बारामती वाहतूक बंद करण्यात आली आहे.
नीरा नदी ला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. नदीच्या काही बांधाऱ्यांचे दारे बंद असल्याने गावात पाणी जाण्याची शक्यता आहे. तरी संबंधित यंत्रनेने लक्ष्य द्यावे .
सूरेश शेजूळ, तहसिलदार माळशिरस
निरा नदीवरील काही बधार्याची दारे न उघडल्यामूळे हा प्रकार झाला असून यामूळे नदीच्या पाण्याची पातळी वाढून पूर आला आला— ग्रामस्थ कूरबावी,ता.माळशिरस
0 Comments