Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute धर्मपुरी येथिल वाघजाईनगर मध्ये राष्ट्रीय महामार्ग वाल्यांचे निकृष्ट काम


महादरबार न्यूज नेटवर्क -
पहिल्याच पावसात रस्ता क्रॉसिंग साठी आणि लहान मुलांना शाळेत ये जा करणाऱ्यांसाठी बनवलेला बोगदा तुडुंब भरून वाहत आहे.आणि त्यात रस्ते प्रशासन ने पाणी निघून जाण्यासाठी पण कोणताही पर्यायी मार्ग केला नाही. यामुळे बोगद्या शेजारील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सर्व बाजूचे पाणी जमा होऊन नागरिकांच्या दारात घरात घुसत आहे तरीही रस्ते प्रशासन शांत आहे.
येन माऊलीच्या पालखीच्या तोंडावर सुद्धा हे जर असे रस्त्याचे हाल असेल तर वारकरी बांधव आणि शाळकरी मुलांनी करायचे काय.

जर शाळकरी मुलांच्या शाळा चालू होईपर्येंत बोगद्याचे पाणी न साठून पाण्याची विल्हेवाट लावायची कामे जर नाहीत झाली आणि स्ट्रीट लॅम्प सगळे चालू नाहीत लवकरात लवकर झाले  नाही तर लवकरच आम्हाला भवाणीनगर टोलनाक्यावर आंदोलन करून शाळकरी मुलांना आणि पाण्यामुळे त्रस्त नागरिकांना न्याय मिळवून द्यावा लागेल.
- रविराज बोत्रे(उद्योजक )

Post a Comment

0 Comments