#Malshiras:माळशिरस तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशमुखवाडी ग्रामपंचायत बिनविरोध
सरपंच व सदस्य पदासाठी शेकडो अर्ज दाखल
महादरबार न्यूज नेटवर्क -
आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देशमुखवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी केवळ एकच अर्ज आल्याने व नऊ सदस्याच्या जागेसाठी नऊच अर्ज आल्याने या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध हे स्पष्ट झाले असून केवळ औपचारिक घोषणाच बाकी आहे.
सरपंच पदासाठी प्रतिमा अविनाश देशमुख यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची सुरपंच पदासाठी बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झाले आहे .तर बिनविरोध निवड होणारे उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक एक विक्रम विष्णु भगत, प्रियंका भाऊसाहेब भोसले शुभांगी अजित महारनवर प्रभाग क्रमांक दोन रुपाली महेश जगदाळे आनंदराव हरीबा देशमुख, जयश्री दिपक धुमाळ,प्रभाग क्रमांक तीन ज्ञानेश्वर विठ्ठल जगदाळे,अस्मिता योगेश भगत,मनिषा सतिष जगदाळे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन एस पी रणदिवे यांनी तर सहाय्यक म्हणून आर टी पवार यांनी काम पाहीले.
माळशिरस तालुक्यातील 10 ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सरपंचपदासाठी 38 तर सदस्य पदासाठी ४०० अर्ज दाखल
माळीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी2 ,सदस्यासाठी 44,लवंग ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 9 , सदस्यासाठी 63,धर्मपुरी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी 5, सदस्यपदासाठी ५२,कारुंडे सरपंच पदासाठी 4 , सदस्यासाठी 40,वाफेगाव सरपंच पदासाठी 3, सदस्यपदासाठी ४०,कोंढारपट्टा सरपंच पदासाठी 4 , सदस्यासाठी २१,देशमुखवाडी सरपंचपदासाठी 1 , सदस्यासाठी 9,कण्हेर सरपंच पदासाठी 5 ,सदस्य पदासाठी 56,सवतगव्हाण सरपंचपदासाठी २ सदस्यासाठी 25,दहिगाव सरपंच पदासाठी 3 ,सदस्यासाठी 50 असे सरपच पदासाठी 38 तर सदस्यासाठी400 अर्ज दाखल झाले आहेत.तर सुळेवाडी सरपंच पोट निवडणुकीसाठी ४ , डोंबाळवाडी खुडूस सदस्य पोट निवडणुकीसाठी 3,पिलीव सदस्यासाठी 2 अर्ज दाखल झाले आहेत.
Comments
Post a Comment