#Varvand:दौंड ला कुरकुंभ फिडरच्या दाब वाहिनीचे भुमीगत कामांचे भूमिपूजन
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
दौंड विद्युत उपकेंद्रतून निघणाऱ्या २२ केव्हीए क्षमतेच्या वाहीणीचा पोकार लाकूड वखार ते दौंड पोलीस स्टेशन व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे उद्यान समोरील कुरकुंभ फिडरच्या उच्चदाब वाहिनीचे भुमीगत करण्याच्या कामांचे भूमिपूजन आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते करण्यात आले.
यामुळे दौंड व्यापारी पेठेतील व शहर परिसरातील वाहिनी तुटून वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे तसेच पथदिवे बसविण्याचे काम देखील होणार आहे. सदर कामाकरीता एकूण खर्च २ कोटी २४ लाख अपेक्षित असून, त्यापैकी १ कोटी ९२ लाख रूपये महावितरणच्या देखभाल दुरुस्ती योजनेमधून तर उर्वरित ३२ लाख रूपये जिल्हा नियोजन समिती कडून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सदर कामाच्या भूमिपूजन प्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री. प्रेमसुखजी कटारिया, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. संदिप दरवडे, उपकार्यकारी अभियंता श्री. विक्रम चव्हाण, दौंड शहर अभियंता श्री. बशीर देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. हरिभाऊ ठोंबरे, माजी नगरसेवक श्री. बबलू कांबळे, श्री. शहनवाज पठाण, श्री. अमोल काळे, श्री. राजू बारवकर, श्री. फिलीप धुमाळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment