#Chiplun:धामापूर जि. प.गटातील बुरंबाड गावातील विकासकामांची उद्घाटने व भूमीपुजने आ.शेखर निकम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

विकास कामे करताना आपले कुंटुंब दुर्लक्षीत करु नका; मुलांना उच्च शिक्षित करा यासाठी माझे सहकार्य निश्चितच असेल - आ. शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड गावच्या विकासासाठी लोकांच्या मागणीनुसार रस्ते, पाखाडी, संरक्षक भिंती, अंगणवाडी इमारत या गोष्टी विकास कामाच्या स्वरुपात करणे अत्यंत आवश्यक होते. त्याबाबतचा सततचा पाठपुरावा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांचे सहकार्याने शासन स्तरावर करुन विविध योजनेद्वारे रु. 1 कोटी 10 हजाराचा निधी मंजूर करुन आणण्यात आला. या मंजूर कामाची उद्घाटने व भूमीपुजने असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार शेखर निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडली.


आमदार शेखर निकम यांनी भरघोस निधी मंजूर करुन आणल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले व त्यांचा सन्मानपुर्वक सत्कार केला व विकास कामांची गरज लक्षात घेता दाखवलेल्या तत्परतेचे कामाच्या कार्यपद्धती बद्दल समाधान  व्यक्त केले व खंबीरपणे पाठीशी आहोत विश्वास दिला.

आमदार शेखर निकम यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामस्थांच्या उत्साह व उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले. विकास कामे करताना ही कामे होत राहतील मात्र हे करत असताना आपल्या कुंटुंबाच्या विकासाकडे दुर्लक्ष होवू नका. मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण द्या त्यांना उच्च शिक्षित करुन स्वत:च्या पायावर उभे करा यासाठी माझ्याकडून आपणास पुर्णत: सहकार्य केले जाईल. कारण स्व. गोविंदराव निकम साहेबानी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडवण्याचा आदर्श घालून दिला आहे. बुरंबाड कॅनॉलद्वारे पाण्याचे नियोजन होणार आहे. यासाठी नवतरुणांना शेती पुरक व्यवसायाचे महत्त्व पटवून शेतीपुरक उद्योगावर लक्ष्य केंद्रित करावे. तरच नवयुकांची प्रगती होईल. आजकाल गावातील युवकांना मुंबईत नोकरी मिळणे हे फारच कठीण झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतीत लक्ष घालून तरुनांनी गावात राहुन प्रगती करावी. मंजूर झालेली विकास कामे ही चांगल्या प्रतीची व्हावी यासाठी ग्रामस्थांनी आवर्जुन लक्ष घालावे. उर्वरीत होणारी कामे निच्छितच पुढील टप्यात पुर्ण केली जातील असा शब्द दिला.

यावेळी  राजेंद्र सुर्वे, बुरंबाड गावचे सरपंच कवळकर मॅडम, सुरेश कवळकर (गावकर) माखजन गावचे सरपंच महेश बाष्टे, रमाकांत घाणेकर, जाकिर शेखासन, सुशिल भायजे, शशिकांत घाणेकर, शैलेश धामस्कर, गणपत कवळकर, सुरेश कवळकर, मनोज शिंदे, तुकाराम मेस्त्री, सुरेश म्हादगे, सिद्धार्थ पवार, तुकाराम पाष्ट्ये, काका लिंगायत, स्वप्नील बापट, नाना जोशी, प्रकाश वीर, सचिन चव्हाण, आबंव गावचे सरपंच शेखर उकार्डे, शैंलू धामणस्कर, अक्षय चव्हाण,अजित मोरे, बबू कवळकर, मंदार कवळकर, पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत