Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:नातेपुतेसह परीसरात मराठा आरक्षण मिळाल्याने जल्लोष,फटाके फोडून,पेढे वाटुन केला आनंद साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंतरवाली सराटी येथून सुरू झालेले आंदोलन मुंबईच्या वेशीवर थोपविण्याात राज्य सरकारला यश आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात काढलेल्या अध्यादेशात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुधारणा सुचविल्यानंतर सुधारित अध्यादेश रात्री काढण्यात आला.  याबद्दल मूबईला गेलेले  मोर्चेकरी नातेपुते येथे पोहचल्यावर त्यांचे शहरातील मराठा भगिनीनी औक्षण करण्यात आले,  शहरात सर्वञ मूख्यमंञी एकनाथ शिंदे,मनोज जरांगे बॅनर लक्ष वेधून घेत होते.तसेच शहरातील पूणे — पंढरपूर मार्गावरील मोठ्या प्रमाणात जेसीबीतून गूलालाची मूक्त उधळण करण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेले कित्येक महिने आंदोलन चालू आहे. मनोज जरांगे पाटलांसह राज्यभरातील असंख्य मराठा त्यासाठी एकवटले होते. मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटी येथून उपोषण सुरू केले होते. त्यानंतर त्यांच्या या उपोषणाचे रुपांतर भव्य आंदोलनात झाले !
या यशाबद्दल नातेपुते येथील शिवाजी महाराज स्मारकासमोर डी.जे.दणदणाटात ,जेसीबीतून , गूलाल मूक्त उधळून,फटाकेची आतेषबाजी करूण,तरूणांनी  मोठ्यां प्रमाणात जल्लोष करण्यात आला.यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील नागरीक मोठ्या सख्येने उपस्थीत होते.

यावेळी शिवप्रसादचे चेअरमन शरद मोरे,उत्तम सावंत,प्रणव थोरात,वैभव मोरे,सूशांत पाटील, राजदीप  देशमूख,शरद सांळूखे,माऊली देशमूख, संदीप वाघ,सतीश निकम, सोमनाथ पोळ, सत्यजीत सावंत , सागर सुरवसे, अनिल जाधव,शेखर अटक,प्रा.पूष्पा सस्ते,अरूणा सावंत,जयश्रीअटक,मनिषा जाधव,समीक्षा जाधव,सूरज करळे,सोमनाथ निकम,शरद शिदे,विराज शिदे,किरण शिदे,

Post a Comment

0 Comments