#Natepute:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढे वस्ती (कारूंडे)शाळेत भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
महादरबार न्यूज नेटवर्क -
कारूंडे ता.माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढे वस्ती (कारूंडे)शाळेत भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संजय पाटील तर पाहुणे म्हणून सुबोध शिंदे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ ज्ञानदेव लोंढे बापू
हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री लोंढे सर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .त्यानंतर सामुदायिक कवायत ,देशभक्तीपर गीत आणि गीताचे उत्कृष्टरित्या सादरीकरण करण्यात आले. दोन्हीही गीतासाठी मान्यवरांनी व पालकांनी शाळेस बक्षिसे दिली-
अण्णासाहेब पवार, विजय मस्कर, जितेंद्र गायकवाड ,जगन्नाथ लोंढे बापू ,संजय पाटील, अनंता साळुंखे ,सुरेश लोंढे ,उमेश गोसावी, तुकाराम गोसावी ,तुकाराम हरी गोसावी ,सुबोध शिंदे, अशोक गोसावी ,सुनील लोंढे ,अशोक बापट मोरे ,अशोक मोतीराम गोसावी यांनी
बक्षीसाच्या रूपात विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले आणि बक्षीस म्हणून शाळेला काही रक्कम देणगी म्हणून देण्यात आली.
पालकांनी मोठ्या प्रमाणात गोळ्या बिस्किटे आणली होती.पालकांचे मनोगत ,यामध्ये लोंढे वस्तीवरील पालक सुरेश लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेला येणाऱ्या अडीअडचणी, शाळेच्या गरजा आपल्या मनोगता मधून व्यक्त केल्या .त्यामध्ये शाळेला गेटची कमान करणे नावासह ,पिण्याच्या पाण्याची सोय आणि टॉयलेट बाथरूम वरील पत्रा टाकणे या अडचणी त्यांनी आपल्या मनोगत मधून व्यक्त केल्या.
शाळेच्या अडीअडचणी व शाळेच्या गरजा लक्षात घेऊन कार्यक्रमास उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पाटील ,सुबोध शिंदे , जितेंद्र गायकवाड, विजय मस्कर या आणि इतर पालकांनी शाळेच्या वरील गरजा सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन लवकरात लवकर या शाळेच्या गरजा पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले.
यावेळी संजय पाटील ,सुबोध शिंदे ,जगन्नाथ लोंढे,
जितेंद्र गायकवाड, विजय मस्कर, सुरेश लोंढे ,
आनंता साळुंखे, संतोष गोसावी, विठ्ठल काटे,आनंता माने, उद्योजक अनिल शिंदे यांच्यासह शाळा व्यवस्थापन सदस्य तसेच पालक,माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेतील सहशिक्षिका श्रीमती निकम मॅडम यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment