Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat गोरक्षक अहिरेश्वर जगताप यांची मानद प्राणी कल्याण अधिकारी पदी नियुक्ती..


महादरबार न्यूज नेटवर्क -  संतोष जगताप
महाराष्ट्र शासन मानद प्राणी कल्याण अधिकारी म्हणून दौंड तालुक्यातील वरवंड येथील गोसेवक तथा प्राणीमित्र अहिरेश्वर जगन्नाथ जगताप यांची २९ डिसेंबर २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

गेली ११ वर्षांपासून संघर्ष करत, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे दिवस रात्र याची तमा न बाळगता अविरत फक्त गोसेवा हेच ध्येय असणा असणारी व्यक्ती व्यक्ती , गोसेवा केल्याबद्दल तसेच संकटात सापडलेल्या हजारो जखमी अन्य जीवांना वाचविल्यामुळे त्यांना ही संधी मिळालेली आहे. याबद्दल अहिरेश्वर जगताप यांनी शासनाचे तसेच पोलिस प्रशासनाचे व कायम आपल्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद मानले. तसेच मिळालेल्या संधीचे सोने करत अजून जास्तीत जास्त मुक्या जीवांच्या सेवेसाठी कार्य करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना अहिरेश्वर जगताप यांनी सांगितले.

मुंबई मंत्रालयातून सदर नियुक्ती ओळखपत्र स्वीकारत असताना सर्व श्रेय आई गोमातेचे व सहकारी मित्र यांचे आहे असेही ते यावेळी म्हणाले. जगताप यांना देशभरातून विविध संघटना व गोप्रेमी कडून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments