महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते येथे आगामी काळात सूसज्ज असे सांस्कृतिक भवन उभारणार असल्याचे मत माजी आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केले ते समता इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक विविध गुणदर्शन कार्यक्रमात बोलत होते.
प्रारंभी माळशिरस तालुक्याचे आरोग्यदुत माजी आमदार राम सातपुते व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी चिमुकल्यांनी भरवलेल्या विज्ञान प्रदर्शनाची पाहणी केली .महाराष्ट्र गीता सादर करण्यात आले. तसेच आदेश नाळे, देवांश नाळे,स्वरा नाळे व विश्वजीत चिकणे यांनी गोवा येथे कराटे स्पर्धेत व आदित्य कर्चे याने नेट बॉल या खेळामध्ये नॅशनल स्तरापर्यंत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास नगरसेवक समता परीवाराचे अॅड बी.वाय. राऊत. ॲड.रावसाहेब पांढरे केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. बी वाय राऊत, नगरसेविका सविता बरडकर, मायाताई उराडे , शर्मिला चांगण, समता पतसंस्थेचे संचालक .,अबादास बरडकर, फंटा आण्णा टेंबरे, रामभाऊ बोराटे, संतोष राऊत, संस्थेचे सचिव नितीन नायकवडी, सहसचिव लीलावती राऊत, उपाध्यक्ष श्रद्धा राऊत, उपमुख्याध्यापिका सौ.सुनिता फुले , प्रा. केशव बांदल, कुसुम बांदल, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन संतोष काळे , बाळासाहेब पांढरे , शशिकांत बरडकर, ॲड.पाडुरंग लांडे, वैभव शहा, नंदकुमार भिसे , विकासरत्न सोसायटीचे चेअरमन सावता बोराटे, अर्जुन पिसाळ , धनंजय रासनकर , गंगाराम दुधाळ, माजी सरपंच अर्जुन दुधाळ , विनोद बुलुंगे , सुवर्णा बुलुंगे, हनुमंतराव धालपे , राजेंद्र पांढरे ,अमित चांगण,भैय्या चांगण , आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कविता लोंढे यांनी केले.संस्थेचे सर्व शिक्षक पालक, वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन संस्थेचे विशाल राऊत यांनी केले.
0 Comments