Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute जाधववस्ती (धर्मपुरी) शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त आर्यन फार्म फ्रेशच्या वतीने सर्व मुलांना ड्रेस वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क -
दि. ३ जानेवारी २०२५ बालिका दिनादिवशी, जि.प.प्राथ.शाळा जाधववस्ती (धर्मपुरी) या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आदरणीय मा.श्री.डॉ. आबासाहेब  हरी पवार गटविकास अधिकारी, माळशिरस यांच्या हस्ते करण्यात आले. एका वर्गखोलीचे उद्घाटन सौ.नीता झेंडे व जाधववस्तीच्या माता पालक यांच्या हस्ते करण्यात आले. ३ वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ मध्ये जाधववस्ती(धर्मपुरी) या शाळेची जुनी इमारत बाधित झाली होती. त्यानंतर आता नवीन शाळा बांधकाम पूर्ण करण्यात आले.


त्यानिमित्त आर्यन फार्म फ्रेशचे मालक श्री.कृष्णांत मोरे यांनी शाळेतील सर्वच्या सर्व ४५ विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम दर्जाचे स्पोर्ट्स गणवेश वाटप करुन तालुक्यात एक आदर्श घालून दिला. त्यानिमित्त गटविकास अधिकारी साहेबांच्या हस्ते त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.


आदरणीय मा.श्री. डॉ. आबासाहेब पवार साहेब यांनी शाळेचे उद्घाटन केल्यानंतर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करावा? आनंददायी शिक्षण कसे असावे? शिक्षणाचा खरा अर्थ काय? विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कसा वाढवावा? शिक्षणाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात विद्यार्थ्यांना कसे पुढे न्यावे? यासंबंधी पालक व विद्यार्थी यांच्याशी हितगुज साधत अतिशय मौल्यवान व प्रभावी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमानिमित्त धर्मपुरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.दत्तात्रय झेंडे सर यांनी जाधववस्ती शाळेचा चढता आलेख, राबविले जाणारे विविध उपक्रम, केंद्रातील इतर शाळांची चांगली कामगिरी, याबद्दल साहेबांना माहिती दिली. त्यासोबतच आदरणीय साहेबांची तालुक्यातील शिक्षण क्षेत्राकडे असणारी जवळीक व आपुलकी याबद्दल पालकांना माहिती दिली. या कार्यक्रमानिमित्त शाळेमध्ये कार्यरत शिक्षक श्री.संतोष धुमाळ सर, श्री.गोरख निगडे सर, तसेच सौ.तृप्ती केंजळे मॅडम यांचा उत्तम कार्याबद्दल माननीय B.D.O. साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास सौ.निता झेंडे (सरपंच), श्री.नितीन निगडे (उपसरपंच), श्री.बाजीराव काटकर(माजी उपसरपंच), श्री.अमित मसुगडे (पोलीसपाटील), श्री.जाधवसाहेब (विस्तारअधिकारी), श्री.अरूण भोईटे, श्री.दिलीप जाधव, श्री.सुखदेव पाटील, श्री.मोहन मोरे, श्री.नानासो कुंभार, धर्मपुरी केंद्रातील शिक्षकवृंद, तसेच सौ.सोनाली कुलाळ (शा.व्य.स. उपाध्यक्षा), सौ. शितल शेडगे, सौ.उर्मिला मोरे,  सौ.माधुरी कुंभार, सौ.निकिता निगडे, सौ.वंदना जाधव, सौ.वैशाली निगडे मॅडम,आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री.निलेश निगडे (शा.व्य.स.अध्यक्ष) व श्री.सतीश कुलाळ यांनी केले.

Post a Comment

0 Comments