Hot Posts

6/recent/ticker-posts

#Baramati:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा विद्यार्थी नेते रविराजभैय्या बोत्रे यांनी बारामती येथील टि.सी.महाविद्यालयास दिली भेट

महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा विद्यार्थी नेते रविराजभैय्या बोत्रे यांनी बारामती येथील स्वायत्व असलेले तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाला भेट दिली.

यावेळी येथील संगणक शास्त्र विभाग तसेच फूड प्रोसेसिंग विभागाला त्यांनी भेट दिल्या.यावेळी संगणक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख मा. चौधरी सर तसेच प्राध्यापक मा. डॉ.करडीले सर यांच्याशी शैक्षणिक तसेच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या. यावेळी आता चालू असलेल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडं बाजूला येऊन जुन्या महाविद्यालयातील आठवणींना उजाळा मिळाला आणि योग्य ते मार्गदर्शन ही मिळाले अशी प्रतिक्रिया रविराजभैय्या बोत्रे यांनी दिली.यावेळी संगणक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख मा. श्री.चौधरी सर , मा. डॉ.करडीले सर , मा. मानकर सर , मा. विशाल शहा सर , मा. राहुल शहा सर ,मा. दीक्षित सर , तसेच प्रा.कुलकर्णी मॅम,प्रा.लोंढे मॅम,प्रा.गविमथ मॅम , प्रा.चव्हाण मॅम,इ. उपस्थित  होते.
          
त्यांनंतर महाविद्यालय मधील वोकॅशनल विभाग अंतर्गत चालू असलेल्या फूड प्रोसेसिंग विभागाला त्यांनी भेट दिली.यावेळी विभागप्रमुख डॉ.वाजीद खान सर यांच्याशी फूड प्रोसेसिंग तसेच अभ्यासक्रम बद्दल आणि वेगवेगळ्या नवनवीन शोधबद्दल चर्चा झाल्या. यावेळी विभागप्रमुख डॉ.खान सरांनी नव्यानेच अकरावी आणि बारावी साठी अभ्यासक्रमात आणलेल्या फूड प्रोसेसिंग विषयी माहिती दिली.महाराष्ट्र सरकारने त्यांच्या पुस्तकांना संमती दिली आहे.यावेळी हा विषय लवकरात लवकर महाराष्ट्र मधील सर्व महाविद्यालयातील अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात यावा अशी आशा विभागप्रमुख डॉ.वाजीद खान सर यांनी व्यक्त केली.यावेळी तुमचा हा आशय लवकरच वेगवेगळ्या महाविद्यालय समोर मांडला जाईल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे रविराजभैय्या बोत्रे यांनी त्यांना दिले.
             
यावेळी त्यांचे सहकारी आणि YIN सकाळ चे महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री श्री. ए. बी.पाटील,टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि OKISPL चे मा. शंकर सर तोरमल, करमाळा शहर चे युवक नेतृत्व मा. अनिकेत भांड आणि सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments