Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun हातिव मोहल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट)ला मोठे बळ; आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत युवक-ग्रामस्थांचा पक्षप्रवेश

        गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

हातिव मोहल्ला (ता. संगमेश्वर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)च्या वतीने आयोजित कार्यक्रमात युवक रेहान गडकरी यांच्यासह मोठ्या संख्येने युवक, महिला व ग्रामस्थांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षात जाहीर प्रवेश केला. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला आरडीसी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, पंचायत समिती देवरुखचे उपसभापती प्रफुल्ल बाईत, हनिफशेठ हर्चीरकर, मंगेश बांडागळे, हुसेन बोबडे, प्रफुल्ल भुवड, नितीन भोसले, पंकज पुसाळकर, प्रतीक साळवी, यशवंत गोपाळ, बंधू सुर्वे, मानसी करंबेळे, अनिल पंजेरे, रूपाली पवार, बाबामिया जेठी, दीक्षा बांडागळे, उस्मान साटविलकर, मुजीब साटविलकर, रमजान साटविलकर, बशीर गडकरी, इब्राहिम गडकरी, आयुब साटविलकर, मुराद गडकरी, अहमद साटविलकर, उत्तम पवार, परशुराम घडशी, असलम धामस्कर, रामशेठ पंदेरे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी भाईजान गडकरी, असत गडकरी, अहमद बोबडे, अहमद साटविलकर, हसन साटविलकर, मुस्तफा साटविलकर, बशरथ साटविलकर, शाहरुख, शोएब नासिरकर, महारुफ साटविलकर, सहीम गडकरी, सोहेल गडकरी, तोसिफ गडकरी, बिलाल साटविलकर, रईस साटविलकर, फैसल साटविलकर, तसकीन गडकरी, खैरूनिसा फकीर, तानिया गडकरी, सफिना गडकरी, निकोबार परबुलकर, नाझीमा साटविलकर, नजराना टिकले, नीलम साटविलकर, हबाबी गडकरी, जैना शेख, रईसा परबुलकर, हमिदा गडकरी, अस्मा साटविलकर, सोलिया साटविलकर, निदा गडकरी, रिजवाना गडकरी, जुबेदा साटविलकर, शफिया परबुलकर, नुरजान साटविलकर आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)मध्ये प्रवेश केला.

पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे आमदार शेखरजी निकम यांनी स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले. आपल्या मनोगतात ते म्हणाले की, राजकारण हे केवळ निवडणुकांसाठी नसून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असते. गावाचा विकास, रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा यांसोबतच मुला-मुलींच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षणामुळेच समाजाची खरी प्रगती होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो. जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास विकासकामांच्या माध्यमातून अधिक दृढ करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे.

यावेळी आमदार निकम यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाची गती कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments