Hot Posts

6/recent/ticker-posts

#Baramati जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळे वस्ती येथील विद्यार्थ्यांनी साकारला पालखी सोहळा


महादरबार न्यूज नेटवर्क -

बारामती तालुक्यातील निरावागज गावातील पन्हाळेवस्ती या जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी दिंडीचे आयोजन करण्यात आले.यामध्ये विद्यार्थी व पालक हे वारकऱ्यांच्या भूमिकेमध्ये सहभागी झाले होते. पन्हाळे वस्तीवरील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट खाऊ वाटप केले व आपला सहभाग नोंदवला.

आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचे विद्यार्थ्यांना ओळख व्हावी तसेच साधूसंतांनी केलेल्या महान कार्याची ओळख देखील येणाऱ्या पिढ्यांना व्हावी या दृष्टीने वारकरी संप्रदायाची परंपरा जपणाऱ्या कल्पनांना वाव देण्यात आला. यामध्ये पालक विद्यार्थी व शिक्षक यांनी देखील फुगडी खेळण्यात आली. ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत चिमुकल्यांनी दिंडीचा आनंद लुटला. तसेच वेगवेगळी भक्ती गीते देखील यावेळी लावण्यात आली होती.

सदरील पालखी सोहळ्याचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भाग्यश्री कलढोणे मॅडम व श्री विनोद खंडागळे सर व इतर शिक्षकांनी केली होते. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले. तसेच भविष्यात देखील विविध उपक्रम या शाळेमध्ये राबवणार असल्याची माहिती शालेय शिक्षकांनी दिली.

Post a Comment

0 Comments