महादरबार न्यूज नेटवर्क -
आषाढी वारी आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्या वतीने नातेपुते पोलीस प्रशासनाला १५ बॅरिकेट्स भेट देण्यात आले.
या उपक्रमासाठी चंदूकाका सराफचे मार्केटिंग हेड कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली क्लस्टर हेड विनीत शहा, ब्रँच मॅनेजर सुमय सय्यद तसेच ए.बी.एम. अभिजित आडाणे यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, अमोल देशमुख तसेच अधिकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते .
यावेळी नातेपुते मार्केटिंग टीममधील सागर मडाणे, योगेश दाभाडे आणि सद्दाम काझी यांची उपस्थिती होती. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि वाहतुकीचे नियोजन लक्षात घेऊन हे बॅरिकेट्स पोलीस प्रशासनाच्या सेवेत देण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनाने चंदूकाका सराफ यांच्या सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाचे स्वागत करत आभार व्यक्त केले. या बॅरिकेट्समुळे गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
0 Comments