महादरबार न्यूज नेटवर्क -
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण राज्यांमध्ये अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथील शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व ग्रामस्थांनी या अभियानामध्ये भाग घेण्याचे ठरवले.
11 नोव्हेंबर 2025 रोजी प्राथमिक स्वरूपामध्ये या अभियानाचा शुभारंभ स्वच्छता मोहिमेने करण्यात आला.हा हा म्हणता अख्खा गाव शाळामय झाला.आपल्या बाळांची शाळा इंग्लिश मीडियम पेक्षाही सुंदर दिसायला हवी ही कल्पना शिक्षकांनी मांडल्यानंतर पालकांनी दिवस-रात्र कष्ट करून शिंदेवाडी शाळेचे पूर्ण रूप बदलून टाकले.
संपूर्ण गाव शाळेमध्ये यायला सुरुवात झाली काही ग्रामस्थ आर्थिक रूपाने मदत करू लागले तर काही श्रमदानाने क्रांतीची मशाल पेटली सगळीकडे जिल्हा परिषदेची शाळा मुख्यमंत्री अभियानामध्ये यशस्वी होणार आणि त्यासाठी आपल्या गावातले तरुण दिवस-रात्र झटत आहे त्याचा अभिमान वाटायला सुरुवात झाली .घराघरातल्या माय भगिनी अभिनंदनचा वर्षाव करीत शुभेच्छा रुपी बळ देताना दिसत होत्या. दिवस रात्र गावातील 40 ते 50 तरुण शाळेसाठी कष्ट करत होते .पूर्ण शंभर वर्षाची ही जुनी इमारत पूर्ण अवस्थेत आणताना अनेक कामे शाळेला करावी लागली.प्रत्येक भिंत प्लास्टर करणे ,फरशी बदलणे, कलर काम ,पर्यावरण पूरककक्ष उभारणे ,क्रीडांगणासाठी मैदान तयार करणे ,परिपाठासाठी भव्य व्यासपीठ तयार करणे, कला मंच तयार करणे ,प्रशस्त बहुउद्देशीय सभागृह तयार करणे, परसबागेसाठी ग्रीन हाऊस तयार करणे आकर्षक प्रशासकीय कार्यालय व मुलांसाठी स्वच्छ स्वच्छता ग्रह, प्रशस्त असे साने गुरुजी वाचनालय ,शुद्ध पाण्याचे युनिट, ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठकीव्यवस्था, समोरच्या बाजूला प्रशस्त बगीचा ,आकर्षक स्वागत कमान, पारावरची शाळा, प्रत्येक वर्ग अध्ययन निष्पत्ती नि परिपूर्ण असा वर्ग ,प्रयोगशाळा असे अनेकविध उपक्रम राबवत या शाळेने विद्यार्थी गुणवत्तेबरोबर समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे .जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की लोक नाक मुरडतात परंतु शिंदेवाडी चा ग्रामस्थ आमच्या गावची शाळा पाहायला चला असं अभिमानाने सांगतो .
सर्वगुणसंपन्न शिक्षक वृंद, कर्तव्यदक्ष शाळा व्यवस्थापन समिती आणि दानशूर ग्रामस्थांच्या सहकार्याने हे शक्य झाले आणि म्हणूनच 392 शाळा असणाऱ्या माळशिरस तालुक्यामधून ही शाळा पहिली आल्याचा आनंद शिंदेवाडी ग्रामस्थांनी फटाके फोडून व्यक्त केला.
या यशाबद्दल माळशिरस तालुक्याचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी, शिक्षण विस्तार अधिकारी असलम इनामदार ,केंद्रप्रमुख सिद्धेश्वर भरते यांनी अभिनंदन केले.
24 लाख 78 हजार रुपये लोक वर्गणी मधून केला आमुलाग्र बदल, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली शाळेची निवड
0 Comments