Hot Posts

6/recent/ticker-posts

#Morochi विद्यार्थी मंत्रिमंडळ पदग्रहण सोहळा उत्साहात


महादरबार न्यूज नेटवर्क - 
डॉ. निटवेज ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, मोरोची येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी मंत्रिमंडळ पदग्रहण सोहळा आज दि.२८ जुलै रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना, शिस्त, सेवाभाव आणि लोकशाही मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय जे. निटवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस पंचायत समिती शिक्षण विभाग असिस्टंट कम डाटा ऑपरेटर श्री. नवनाथ भानवसे सर व मोरोची केंद्र केंद्रप्रमुख श्री.अरूण राठोड सर उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण ए. पाटील आणि वरिष्ठ समन्वयक समीर पठाण सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवता माता सरस्वती , युवक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थी मंत्रिमंडळातील Head Boy, Head Girl, Discipline Head, Sports Head, Cultural Head, तसेच विविध समित्यांच्या प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते बॅज प्रदान करून पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे श्री अरूण राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, "नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे, तर जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपत इतरांसाठी आदर्श निर्माण करणे होय," असे प्रतिपादन केले.संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय निटवे यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्ये, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असा संदेश दिला.मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण पाटील यांनी विद्यार्थी मंत्रिमंडळाचे अभिनंदन करून त्यांना शाळेच्या प्रगतीसाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ समन्वयक समीर पठाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश सोरटे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख मनीषा पवार व मराठी विभागप्रमुख सुनंदा पवार यांनी केले व आभार प्रदर्शन वरिष्ठ समन्वयक समीर पठाण सर यांनी केले.कार्यक्रमाला शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेला हा पदग्रहण सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

Post a Comment

0 Comments