Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute'तोतया पोलीस' बनून वृद्ध महिलेचे दागिने चोरणारा अटकेत; नातेपुते पोलिसांची धडक कारवाई



महादरबार न्यूज नेटवर्क - 
 स्वतःला पोलीस असल्याचे भासवून आणि 'सरकारने अंगावर सोने घालण्यास बंदी घातली आहे' अशी खोटी बतावणी करून, एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील १ लाख ६६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या मुख्य आरोपीला नातेपुते पोलिसांनी जेरबंद केले आहे.

दिनांक ०९ जून २०२६ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास फिर्यादी विमल शंकर जैन (वय ७६, रा. नातेपुते) या नातेपुते एसटी स्टँड जवळील अहिल्यादेवी पुतळ्याजवळ थांबल्या होत्या. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी "आम्ही पोलीस आहोत, सरकारने सोने अंगावर घालण्यास बंदी घातली आहे," असे सांगून त्यांना भीती घातली. सुरक्षिततेचे कारण देत त्यांनी वृद्ध महिलेला गळ्यातील सोन्याचे लॉकेट काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले आणि हातचलाखी करून दागिने चोरून पोबारा केला. या प्रकरणी नातेपुते पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१) २१ ग्रॅम वजनाचे बदाम असलेले सोन्याचे लॉकेट (किंमत ८१,०००/- रु.)
२) २२ ग्रॅम वजनाचे त्रिकोण लोगो असलेले सोन्याचे लॉकेट (किंमत ८५,०००/- रु.)
(एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल)

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपास व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा गुन्हा कल्याण येथील आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले. नातेपुते पोलिसांनी कल्याण येथील खडकपाडा पोलिसांच्या मदतीने सापळा रचून शहाजुर अफसर इराणी (वय ५०, रा. मंगल नगर, अटारी रोड, कल्याण) याला ताब्यात घेतले आहे.

ही कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे आणि अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विशाल वायकर, सफौ. देविदास धोत्रे, पोलीस नाईक राकेश लोहार, रणजीत मदने, असलम शेख, गणेश कापसे तसेच खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे, सफौ. सुधीर पाटील, पोपट दुलगुंड यांनी सहभाग नोंदवला

Post a Comment

0 Comments