Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras:माळशिरस येथे स्वर्गीय आमदार डोळस प्रतिष्ठानच्या वतीने जयंत चषक २०२४ भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

उद्घाटनाला प्रमुख पाहुणे प्रतीक दादा पाटील उपस्थित


महादरबार न्यूज नेटवर्क -
स्व. आमदार हनुमंतराव डोळस प्रतिष्ठान माळशिरस तालुका यांच्या विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गटाचे  प्रांताध्यक्ष  आमदार जयंतराव पाटील  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  जयंत चषक २०२४   दि.२८ फेब्रुवारी ते दि.३ मार्च पर्यंत भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दि.२८ फेब्रुवारी रोजी  स्पर्धेचा उद्घाटन समारंभ राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा महाराष्ट्र हॉलीबॉल फेडरेशनचे अध्यक्ष  प्रतीक जयंतराव पाटील यांच्या  हस्ते, व अकलूजचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम के इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय आमदार हनुमंत डोळस यांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आले .


यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रतीक पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये आमदार हनुमंतराव डोळस यांच्या कार्याचा आणि कामाचा उलगडा करताना माजी मंत्री जयंत पाटील आणि स्वर्गीय आमदार हनुमंतराव डोळस यांचा खुप चांगला ऋणानुबंध होता संकल्प डोळस यांना सामाजिक कार्याबरोबर खेळाची आवड असून ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाचे व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी जयंत चषक क्रिकेट स्पर्धा घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले .


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हृदयरोग तज्ञ डॉ. एम के इनामदार आपले विचार व्यक्त करताना म्हणाले हनुमंतराव डोळस हे माझे चांगले मित्र तर होतेच परंतु लोकांसाठी तो एक चांगला माणूस होता त्यांनी दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात अनेक कुटुंबाला आधार दिला अनेक रुग्णांना त्यांनी आर्थिक मदत केली  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस संकल्प डोळस म्हणाले माझे वडील हनुमंतराव डोळस चर्मकार महामंडळाचे अध्यक्ष असताना जयंतराव पाटील अर्थमंत्री होते त्यावेळी त्यांनी महामंडळाला भरीव निधी दिल्याने अनेक लाभार्थ्यांनी कर्ज घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय चालू केला त्याचप्रमाणे वडिलांच्या आजारपणात डॉ एम के इनामदार यांनी खूप मोठा आधार दिला आमच्या पाठीशी ते नेहमीच उभे राहत आहेत

यावेळी व्यासपीठावर सोलापूर जि.प. माजी अध्यक्ष  फत्तेसिंह माने पाटील, डॉ. रामदास देशमुख,  ॲड. प्रवीण कारंडे, मच्छिंद्र गोरड ,श्रीराजभैया माने पाटील, हंसराजभैय्या माने पाटील, निलेश ताड, बाबा जाधव, पै. पप्पू मंडले आदी मान्यवर तालुक्यातील नागरिक व जिल्ह्यातील व पर जिल्ह्यातील खेळाडू  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments