Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:विद्यार्थानी न घाबरता परीक्षेला सामोरे जावे - धैर्यशील देशमूख


महादरबार न्यूज नेटवर्क -
विद्यार्थानी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता,न घाबरता परीक्षेला सामोरे जावे असे मत नातेपुते एज्यूकेशनसोसायटीचे चेअरमन धैर्यशील देशमूख  नी व्यक्त केले. ते येथील नातेपुते एज्यूकेशन सोसायटी संचलित डाॅ.बा.ज.दाते.प्रशालेतील  दहावीच्या विद्यार्थाचा निरोप समारंभ  प्रसंगी बोलत होते..

यावेळी व्यासपीठावरिल विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रशालेचे मूख्याध्यापक विठ्ठल पिसे यांनी  शाळेचा शैक्षणिक चढता आलेख कथन केला.मराठी विषयाचे शिक्षक मूकूद परचंडे यांनी प्रास्ताविक केले याप्रसंगी स्नेहल खूडे,वैषण्वी माळी,तन्वी साळवे.यानी शाळेविषयी ,शिक्षकाविषयी आपले विचार व्यक्त केले.चेअरमन धैर्यशील देशमूख,नंदन दाते, मूख्याध्यापक विठ्ठल पिसे यांनी विद्यार्थाना शूभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमास  नातेपुते एज्यूकेशन सोसायटीचे  चेअरमन धैर्यशील देशमूख,व्हा.चेअरमन सतोष काळे,सेक्रेटरी महेश शेटे,नंदन दाते,मूख्याध्यापक विठ्ठल पिसे,उपमूख्याध्रापक स्नेहल कूलकर्णी, पर्यवेक्षक विनायक देशपांडे,आदि मान्यवर तसेच सारिका जगताप,ज्योती कडबाने,उत्कर्ष दूर्गे,मूकूंद परचंडे,धवल गांधी,आशा टोमके,नामदेव मोटे,आदि मान्यवर,तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूञसंचालन सारीका जगताप यांनी केले तर धवल गांधी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments