महादरबार न्यूज नेटवर्क - याही वर्षी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा ११० वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्याचे वैष्टिये म्हणजे श्री राम जय राम जय जय राम या तारक मंत्राचा अखंड जप बुधवार दि २७/१२/२०२३ सकाळी ६ वाजल्यापासून ते शुक्रवारी दि ५/१/२०२४ सायंकाळी ७.३० पर्यंत संपला.तसेच सांप्रदायिक भारुड,नारदीय किर्तन,पुर्णाहूती यज्ञ सोहळा संपन्न झाला.दि २८/१२/२०२३ ते ४/१/२०२४ पर्यंत कथा प्रवक्ते प.पू.गुरु शिवगुरु पारखी यांचे श्री शिव महापुराण कथा संपन्न झाली.विशेष बाब म्हणजे दि २/१/२०२४ ते दि ४/१/२०२४ रोजी सकाळी ८ ते १२ पर्यंत गावातुन फेरी काढुन महाराजांच्या झोळीच्या रुपात अन्नदान प्राप्त झाले.शनिवार दि ६/१/२०२४ रोजी पहाटे ४.३०ते ५.३० अभिषेक पुजा व काकड आरती व ५.५५ वा गुलाल व पृष्पवृष्टी करण्यात आली.आणि सकाळी १०.३० ते २ पर्यंत सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला.सायंकाळी ६ वाजून ७ मिनिटांनी गोरज या शुभमुर्हतावर चार जोडप्यांचा सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.तसेच सर्व वधूवरांना संसार सेट व ग्रंथ भेट देण्यात आले.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख ,महेश शेटे,बाळासाहेब काळे,रणवीर देशमुख ,किरण टकले,राजाभाऊ देशमुख ,किशोर पलंगे,शक्ती पलंगे व गावातील व इतर गावामधील सर्व प्रमुख मंडळी आदी उपस्थित होते .हा सोहळा संपन्न करण्यासाठी सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक धैर्यशिल (भाऊ) देशमुख,सतिश बर्गे सर,सतिश बडवे,संपत पांढरे,दत्ताभाऊ उराडे,लाळगे गुरुजी,संभाजी लांडगे,जितेंद्र मोरे,जालिंदर ठोंबरे,दिंगबर लाळगे,नवनाथ बर्गे,चंद्रकांत पांढरे व सदगुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर पुण्यतिथी सोहळा समिती नातेपुते यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन-संदिप जाधव यांनी केले.
या सोहळ्याचे मार्गदर्शक धर्येशिल(भाऊ)देशमुख म्हणाले की श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा वारसा घेऊन आम्ही गेली १० वर्षे झाली हा सोहळा संपन्न करीत आहोत आतापर्यंत या सोहळ्यात ११७ विवाह सोहळे संपन्न झाले आहेत.सर्व धर्माचे विवाह या सोहळ्यामध्ये संपन्न झाले आहे .ज्यांची ज्यांची ह्या सोहळ्यामध्ये लग्न होतात त्या सर्वांना महाराज आर्शिवाद देतात.हे सगळं कार्य महाराज घडवून आणतात.
0 Comments