महादरबार न्यूज नेटवर्क - ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून झाली.कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री लक्ष्मण पाटील. उपमुख्याध्यापक जिलानी आतार व सर्व विभाग समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. इयत्ता चौथीच्या मुलांनी आपल्या मनोगतातून आंबेडकरांचे विचार मांडले तर इयत्ता पाचवी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला ड्रामा आणि सामूहिक गीत हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनयातून बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा प्रभावी संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचला.
तसेच मुख्याध्यापक श्री .लक्ष्मण पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशांचा व विचारांचा पुनःस्मरण करून विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचे, बंधुत्वाचे व संविधानिक मूल्यांचे महत्त्व समजावण्यात आले. कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन दिपाली मोरे आणि अर्चना माने यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी संयोजन सामाजिक शास्त्र विषयाच्या शिक्षिका अलका शिंदे यांनी केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेत ज्ञान, प्रेरणा व राष्ट्रभावनेने परिपूर्ण असा कार्यक्रम पार पडला.
0 Comments