Hot Posts

6/recent/ticker-posts

#Morochi ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायत व पोस्ट ऑफिस फील्ड व्हिजिट संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क -
ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, मोरोची येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्र विषयातील प्रत्यक्ष अनुभवासाठी  गुरुवार दि.४/१२/०२५ रोजी ग्रामपंचायत व पोस्ट ऑफिसला शैक्षणिक फील्ड व्हिजिट दिली. या उपक्रमात विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीची कार्यपद्धती, विविध नोंदी, लोकसहभाग तसेच पोस्ट ऑफिसमधील पत्रव्यवहाराची पद्धत, टपाल तिकीटांचा उपयोग याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
    
या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सौ. तायडाबाई भिमराव खिलारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ग्रामविकासातील ग्रामपंचायतीची भूमिका समजावून सांगितली. तसेच पोस्ट ऑफिस कर्मचारी श्री. पंढरी नामदेव पोपुलवार यांनी पोस्ट ऑफिसचे दैनंदिन कामकाज, पार्सल, स्पीड पोस्ट, बचत योजना यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
    
फील्ड व्हिजिटचे मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण पाटील, उपमुख्याध्यापक जिलानी आतार, वरिष्ठ समन्वयक समीर पठाण सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारत आवश्यक ज्ञान मिळविले.सामाजिक शास्त्र शिक्षिका सौ. अलका शिंदे व मनीषा पवार मॅडम, श्रीकांत कदम, व अभिषेक होळकर, व इतर गावकऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण झाली.
     
या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे सामाजिक जाणिवा, प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची तयारी अधिक दृढ झाली. शाळेच्या व्यवस्थापनाने अशा उपक्रमांचे कौतुक करून पुढील काळात अशा उपयुक्त फील्ड व्हिजिटचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments