Hot Posts

6/recent/ticker-posts

#Baramati दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारामतीत बोर्ड परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

लडकत सायन्स अकॅडमीतर्फे L-SAT 2027-28 शिष्यवृत्ती परीक्षा; गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे


महादरबार न्यूज नेटवर्क - 

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा मिळावी, अभ्यासाचे प्रभावी नियोजन करता यावे तसेच विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता आणि आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने लडकत सायन्स अकॅडमी, बारामती यांच्या वतीने भव्य एकदिवसीय बोर्ड परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व L-SAT 2027-28 शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लडकत सायन्स अकॅडमी येथे होणार आहे.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन यासह गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच बोर्ड परीक्षेतील महत्त्वपूर्ण प्रश्नांचे जलद उजळणी सत्र आणि करिअर मार्गदर्शनाच्या माध्यमातून मेडिकल व इंजिनिअरिंग क्षेत्रातील विविध संधींची माहिती दिली जाणार आहे.

कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे L-SAT 2027-28 (Ladkat Scholarship Admission Test) ही शिष्यवृत्ती परीक्षा. या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी टॅबलेट, द्वितीय क्रमांकासाठी टायटन घड्याळ, तर तृतीय क्रमांकासाठी स्कूल बॅग देण्यात येणार आहे.

या कार्यशाळेसाठी नावनोंदणी शुल्क केवळ १०० रुपये असून, विद्यार्थ्यांनी दिलेल्या QR कोडद्वारे ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यशाळेचे ठिकाण : लडकत सायन्स अकॅडमी, सिटी-इन चौक, संभाजीनगर (अर्बनग्रामजवळ), एम.आय.डी.सी., बारामती.

संपर्क : ९५४५ ९५२५४७ / ९५४५ १५२५४७

इयत्ता दहावीच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन बोर्ड परीक्षेची तयारी अधिक सक्षम करावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन लडकत सायन्स अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments