Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते निरबाडे ग्रामपंचायत नवीन ग्रामसचिवालयाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

सुसज्ज ग्रामसचिवालय उभारणार, गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – आमदार शेखरजी निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

निरबाडे गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या निरबाडे ग्रामपंचायतीच्या नवीन ग्रामसचिवालय इमारतीचा भूमिपूजन सोहळा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय शेखरजी निकम यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक, पंचायत समिती सदस्य यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

भूमिपूजन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक तसेच पंचायत समिती सदस्य यांनी गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांचा आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. नवीन ग्रामसचिवालयाच्या माध्यमातून गावातील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल आणि ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार शेखरजी निकम यांनी आपल्या मनोगतात निरबाडे गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. नवीन ग्रामसचिवालयाची इमारत ही केवळ प्रशासकीय इमारत नसून गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. ग्रामस्थांना सर्व सोयीसुविधांनी युक्त असे सुसज्ज ग्रामसचिवालय उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न राहील. गावाचा प्रशासकीय कारभार अधिक सक्षम आणि गतिमान होण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. या कामासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

तसेच निरबाडे गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पाली–निरबाडे रस्ता आणि पुलाचा प्रश्नही आगामी अर्थसंकल्पीय तरतुदीतून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार निकम यांनी स्पष्ट केले. गावातील मूलभूत सुविधा, रस्ते, पायाभूत विकास आणि नागरिकांच्या आवश्यकतांना प्राधान्य देऊन विकासकामे पूर्ण करण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामस्थांनी आमदार शेखरजी निकम यांच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक करत नवीन ग्रामसचिवालयाच्या भूमिपूजनाबद्दल समाधान व्यक्त केले. गावाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार महोदयांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा महाडिक यांनी प्रभावीपणे केले, तर त्यांनीच उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

निरबाडे गावाच्या विकासाच्या दृष्टीने नवीन ग्रामसचिवालयाच्या भूमिपूजनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले असून, पाली–निरबाडे रस्ता व पुलाच्या कामाबाबत आमदारांनी दिलेल्या आश्वासनामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी पंचायत समिती सभापती सुर्यकांत खेतले, दिप्ती महाडिक,संजय कदम, पंचायत समिती सदस्य मेघा इंगावले, निलेश कदम, अजय महाडिक,बाबा महाडिक,महेश महाडिक,रोहन महाडिक,पप्या महाडिक, थोरे गुरुजी, महेंद्र थोरे, राजेंद्र महाडिक,परेल मॅडम, सचिन वाईल, केळसकर साहेब, अभियंता आरेकर, अप्पा महाडिक, दर्शना महाडिक,कविता महाडिक, मैनू सकावरे, व मोहल्यातील ग्रामस्थ, राजवाड्यातील ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments