#Natepute:मोरजाई विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

महादरबार न्यूज नेटवर्क  :-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत सन २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले. विद्यालयातील आठ विद्यार्थी या परीक्षेत पास झाले त्यापैकी कुमारी नीलम दिलीप सुळ हिने ग्रामीण सर्वसाधारण जिल्हा यादीत २०८ गुणासह तर कुमारी भूमिका छगन वावरे १७२ गुणासह जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना  आत्तार  एफ एच व  रुपनवर एस डी यांनी मार्गदर्शन केले.                                       

यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेचे अध्यक्ष  संग्राम सिंह जयसिंह मोहिते-पाटील,  मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,  संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव  हर्षवर्धन खराडे, प्रशालेचे मुख्याध्यापक  विकास सूर्यवंशी तसेच प्रशाला समिती सभापती व सदस्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम