#Natepute: घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना २४ तासाच्या आत अटक

नातेपुते पोलिसांची दमदार कामगिरी

महादरबार न्यूज नेटवर्क -

नातेपुते पोलीस ठाणे हदिदतील इश्वरपिंड पळसमंडळ ता माळशिरस येथिल राहणारे पांडुरंग मारुती बिचुकले हे मुलीचे डिलीवरीकरीता दिनांक ०९ /०१/२०२२ रोजी नातेपुते येथील दवाखान्यात गेले असता रात्रीचे एक वाजता फिर्यादिचे चुलत भाऊ लक्ष्मण बाळु बिचुकले यांनी फिर्यादिस फोन करुन सांगितले कि तुमचा दरवाज्याचे कुलुप तुटलेले दिसुन येत आहे मि आत जाऊन पाहिले असता बेडरुमच्या खोलीतील सामान आस्तावेस्त पडले आहे लाकडी कपाट उघडलेले आहे तुमच्या घरात चोरी झाली आहे.

असे सांगितल्याने फिर्यादिने घरी जाऊन पाहिले असता कपाटातील ठेवलेल्या एका चैनच्या आदित्य ज्वेलर्स नावाच्या पोकेट मध्ये 

१ ) ५०,००० / - रुपये सोन्याचे मनी लहाण मुलाचे कानातील रींग असे दोन तोळाचे वजनाचे 

२ ) ७,५०० / -रुपये बॉस्केट रिंगा तीन ग्रॅम वजनाचे 

३ ) ६,००० / - चांदिचे पैंजन जोड वापरते 

४ ) २,००० / - रुपये रोख रक्क्म असा एकुण ६७,६०० / - रुपयेचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरात प्रवेश करुन चोरुन नेला आहे म्हणुन वगैरे ची फिर्याद नातेपुते पोलीस ठाणे गु र नं ०५/२०२२ भादवि कलम ४५७ ३८० प्रमाणे दिनांक ० ९ / ०१ / २०२२ रोजी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता . 

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी  बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास व गुन्हयातील चोरीस गेलेला

एकुण ६७,६०० / - रुपयेचा व अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी पोलीस पथके तयार करुन गुन्हयाच्या तपासकामी रवाना केले पोलीस पथक असे गुन्हयातील अज्ञात आरोपी व गेलेल्या मालाच्या शोध तपास करीत असताना आरोपी  वैभव भानुदास रुपनवर वय २७ रा पळसमंडळ हा संशयास्पद फिरत आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने व इतर आरोपी   भानुदास माळी रा. पळसमंडळ ,गणेश भानुदास होळ रा. पिरळे , महादेव तुकाराम ठोंबरे रा. नातेपुते ता.माळशिरस यांचे सहाय्याने संगणमत करुन गुन्हा केल्याचे सांगितले त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे . सदर गुन्हयातील मुददेमालाचा शोध तपासकरीत असताना आरोपी वैभव भानुदास रुपनवर वय २७ रा पळसमंडळ गुन्हयातील चोरीस गेलेला वरील वर्णनाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे . 

सदरची कामगिरी ही नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोसई पवार, पोसई बैनवाड, सपोफो गडदे , पोकॉ रणनवरे,पोना महेश पाटील, माने, जमादार , पोकॉ अजित कडाळे, गणेश कापसे, जानकर यांनी ही दमदार कामगिरी बजावली आहे.

पोलिसांनी केलेल्या दमदार कामगिरीबद्दल नातेपुते सह परिसरातील नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम