#Natepute:नवोदय परीक्षेनंतर सार्थक पाटील चे शिष्यवृत्ती परीक्षेतही घवघवीत यश

महादरबार न्यूज नेटवर्क -

सन  २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राध्यापक दुर्योधन पाटील (फडतरी )यांचे चिरंजीव सार्थक पाटील याने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

सार्थक पाटील हा इयत्ता  पाचवी मध्ये डॉ. बा. ज.दाते प्रशाला नातेपुते मध्ये शिकत होता. त्याच्या यशामध्ये त्याचे बारड सर,कुंभार सर, विकास काळे सर, सौ कथले मॅडम  तसेच आई सुगंधा मॅडम या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. या अगोदर झालेल्या नवोदय परीक्षेमध्ये सार्थक पाटील याची निवड पोखरापूर या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी झालेली आहे.त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम