Hot Posts

6/recent/ticker-posts

#Solapur:जनशक्ती संघटना सोलापूर जिल्ह्यातील कार्यकारणी जाहीर

महादरबार न्यूज नेटवर्क -

जनशक्ती संघटना संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  १५ जानेवारी २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची विचार विनिमय बैठक घेण्यात आली.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाबाराजे कोळेकर, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

माढा तालुका अध्यक्षपदी बिरूदेव दादा शेळके व पंढरपूर तालुका संघटक पदी विकी भाऊ घाडगे, मोहोळ तालुका युवक अध्यक्षपदी लखन पेढे यांची निवड करण्यात आली यावेळी जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments