#Malshiras:मेडद सरपंचपदी नाथा आबा लवटे पाटील

मेडद येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत नाथाआबा लवटे पाटील यांनी सौ. लता विजय तुपे यांचा एक मतांनी पराभव करून विजयी झाले 


महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे

मेडद ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच युवराज झुंजे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदी नाथाआबा लवटे पाटील विजयी झालेले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सोमवार दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा माळशिरस मंडल अधिकारी एस के खंडागळे, यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची सरपंच निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती.

सरपंच पदासाठी नाथाआबा लवटे पाटील व सौ. लता विजयराव तुपे यांनी अर्ज दाखल केले होते.

छाननी होऊन प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला दोन वाजता सुरुवात झाली गुप्त मतदान घेण्यात आले त्यामध्ये नाथआबा लवटे पाटील यांना सात मते तर सौ लता विजयराव तुपे यांना सहा मते पडली निवडणूक निर्णय अधिकारी एस के खंडागळे यांनी नाथा आबा लवटे पाटील यांच्या सरपंच पदासाठी विजय असल्याची घोषणा केली.

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरता फोंडशिरस मंडल अधिकारी एस. टी. चव्हाण, ग्रामसेवक आर्.एम. चव्हाण, तलाठी ए .पी. खेडकर यांनी सहकार्य केले ग्रामपंचायत निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्याकरता माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपकरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यांना सहकार्य पोलीस नाईक रुपनवर व पोलीस कॉन्स्टेबल बोराटे यांच्यासह पोलिस प्रशासनातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.

नाथाआबा लवटे पाटील यांची सरपंच पदाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी गुलालाची उधळण हलग्यांचा कडकडाट करून जल्लोष केला. नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी कार्यालयाच्या बाहेर येऊन कार्यकर्त्यांच्या समवेत विजयाचा आनंद लुटला वाजत गाजत ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये नूतन सरपंच ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांनी गर्दी केलेली होती. निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी माजी सरपंच युवराज झंजे व पोपटराव लवटे पाटील सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून होते. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार न घडता सरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडला.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम