#Tuljapur:अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने काक्रंबावाडी येथे करणार शेतकऱ्यांना फळझाडांचे वाटप- महेश कोळेकर


महादरबार न्यूज नेटवर्क- 
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथील शेतकरीपुत्र महेश बजरंग कोळेकर ३१ मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त काक्रंबावाडी येथे फळझाड वाटप करण्याचे योजिले आहे.
                
दरवर्षी ३१ मे हा दिवस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. अलीकडच्या काळात जयंती साजऱ्या करण्याच्या पद्धती बदलत चालल्या आहेत. डीजे, बँड, फटाके अशा समाज विघातक घटकांना आळा घालण्यासाठी महेश बजरंग कोळेकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अशा मार्गाने साजरी करण्याची योजिली आहे अशी माहिती दिली.

आज त्यांनी सर्वांसमोर आदर्श घालून दिलेला आहे. अनावश्यक खर्च टाळून जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजाला त्याचा हातभार लागेल. आणि त्यातून झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम ही साध्य होईल असे ते म्हणाले. आज या त्यांच्या अभिनव अशा उपक्रमाचे संपूर्ण तुळजापूर तालुका भरातून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम