सोलापूर-दि.04 (जिमाका) :- कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी आज सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार घेतला आहे.
श्री. सोनटक्के यांनी यापूर्वी जळगांव माहिती अधिकारी, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी, लातूर जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार तसेच लातूर व कोल्हापूर विभागाचा अतिरिक्त उपसंचालकाचा पदभार यशस्वीपणे सांभाळला आहे.
यावेळी सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयात वरिष्ठ लिपिक अविनाश गरगडे, शरद नलावडे, मिलिंद भिंगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी लिपीक संजय घोडके, वाहनचालक भाऊसाहेब चोरमले, अनिल नलवडे उपस्थित होते.
0 Comments