#Solapur:धर्मपुरी येथील शासकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात राहत नसलेबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रदीप झेंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार
महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस पश्चिम भागातील धर्मपुरी (तालुका माळशिरस) ग्रामपंचायत ने ग्रामसभेचे ठराव करून देखील शासकीय अधिकारी व कर्मचारी गावांमध्ये राहत नाहीत म्हणून धर्मपुरी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीप झेंडे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे कर्मचारी गावांमध्ये राहत नसते बाबत तक्रार केली
आहे .
प्रदीप झेंडे यांनी धर्मपुरी येथील अधिकारी-कर्मचारी गावांमध्ये राहत नसून शासनाची फसवणूक करून घर भाडे घेत आहेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरती शासन आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच सर्व धर्मपुरी येथील अधिकारी यांनी वार्षिक विवरणपत्र मध्ये दिलेली मालमत्ता व प्रत्यक्ष मालमत्ता याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये म्हटले आहे.
प्रदिप झेंडे यांनी दिलेल्या अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, वन मंत्री महाराष्ट्र राज्य, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य,कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत.
Comments
Post a Comment