#Indapur:कळस-वालचंदनगर जिल्हा परिषद गटामध्ये प्रस्थापितांना राष्ट्रीय समाज पक्ष देणार यंदा दणका

आकाश पवार यांच्या रूपांने नवीन जिल्हा परिषद सदस्य होणार असल्याचे सर्वसामान्य युवकांमध्ये चर्चा


महादरबार न्यूज नेटवर्क -
श्री क्षेत्र पंढरपुर नगरी मध्ये राष्ट्रीय समाज पक्षांच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यात त्यागी नेतृत्व महादेवरावजी जानकर साहेब यांनी आकाश पवार यांचे नाव घेत राजकारणातील अनेक किस्से सांगितल्यामुळे कळस-वा.नगर जिल्हा परिषद गटातील प्रस्थापित राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत अशी चर्चा गावा-गावात सुरू आहेत. आकाश पवार हे कळंब ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी भाऊ पवार यांचे चिरंजीव असून त्यानी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षांमध्ये गेली १३ वर्षे काम करून आपले राजकारणात वेगळी ओळख निर्माण केले , असून त्यांना कोणत्याही राजकीय वारस नसताना २०१७ मध्ये निमगाव -केतकी पंचायत समिती गणामधून राष्ट्रीय समाज पक्षांचे उमेदवारी देऊन त्यांना त्या गणांमध्ये ७३० मतदान पडले होते व प्रस्थापितांच्या बुडाला लाग लावून त्यांनी पक्षांनी ठेवलेला विश्वास सार्थ करुन दाखवला व शेती महामंडळाच्या कामगारांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी तत्कालीन महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करून कामगारांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करत मंत्रालयाचे पत्रव्यवहार त्यानी केले आहेत , कळस पंचायत समिती गणामध्ये बोरी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रीय समाज पक्षांने उमेदवार देवून तेथे पक्षांचे उमेदवार विजयी झाल्यामुळे पक्षांचे ताकद वाढले असून वालचंदनगर पंचायत समिती गणांमध्ये रणगांव ग्रामपंचायत मध्ये उमेदवार देऊन सक्षम पणे निवडणूक लढवून पक्षांचे ताकद प्रस्तापितांना दाखविले असून कळस-वालचंदनगर जिल्हा परिषद गणांमध्ये ओबीसी , दलित  व धनगर समाजाचे निर्णायक मतदान जास्त प्रमाणात असून येणा-या जिल्हा परिषद निवडणूकीमध्ये प्रस्तापितांना राष्ट्रीय समाज पक्ष धक्का देणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे.मागील काही दिवसांपुर्वी जिल्हा नियोजन समिती पुणे च्या माध्यमातून लाखो रूपयांचा निधी मंजूर करून आणण्यात त्यांना यश मिळाले आहे अनेक सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी ते लढून त्यांना न्याय हक्क मिळवून देत असताना दिसत आहेत सर्वसामान्य कुटुंबातील युवक यंदा २५ वर्षापासून असलेल्या प्रस्थापितांना धक्का देणार असल्याची चर्चा आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम