#Natepte:चित्रकला स्पर्धेत अर्शचे घवघवीत यश

         
महादरबार न्यूज नेटवर्क  -                     
विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी2022-23 स्पर्धे अंतर्गत  तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत अर्श फिरोज आतार याने यश संपादन केले.सन 2022 23 मध्ये टॅलेंट हंट तालुकास्तरीयचित्रकला स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा देवबासूळ वस्ती शाळेचा विद्यार्थी अर्श फिरोज आत्तार इयत्ता चौथी याने तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला या स्पर्धेत तालुक्यातील 27 केंद्रातून विद्यार्थी आले होते या स्पर्धा माळशिरस बी आर सी या ठिकाणी घेण्यात आल्या तसेच दिनांक 18.1.2023 रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.           

जिल्हा परिषद शाळा देवबासूळ वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर, काळे मॅडम, मुजावर मॅडम तसेच काळुबे मॅडम यांनी त्याला मोलाचे मार्गदर्शन केले .    
तसेच सोमनाथ दडस, रुपनवर सर , सोहम रुपनवर यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय परीक्षेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम