Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमधील मृणाल मोरे ची इस्रो येथे विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -
ग्रामीण भागातील विदयार्थ्यांमध्ये संशोधनाची रुची निर्माण व्हावी तसेच, ग्रामीण विदयार्थ्यांना उच्च तंत्रज्ञान व संशोधन संस्था बघता याव्यात, यासाठी मागील वर्षी नोबेल फाऊंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन जळगाव द्वारा राज्यस्तरीय नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा संपन्न झालेली होती या परीक्षेच्या मुलाखतीचा अंतिम निकाल दि. 16 जानेवारी रोजी संध्याकाळी जाहीर करण्यात आला. राज्यभरातून बसलेल्या विदयार्थ्यानमधून अंतिम 61 जणांची निवड करण्यात आली.


यात सोलापूर जिल्हयातून प्रथम क्रमांकाने तर राज्य स्तरावरून 14 वा क्रमांकाने ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची मधील मृणाल मोरे इ ७ वी हिची निवड झाली आहे.  या अभ्यास दौऱ्यात ईस्त्रो स्पेस लॅब, आयआयटी, प्लाजमा अनुसंधान संस्था व इतर विज्ञान अभ्यासक्रम  संदर्भात संस्थांना भेट देणार. तसेच विद्यार्थी विज्ञान मंथन NCERT, दिल्ली यांनी आयोजित केलेल्या National level science exam मध्येही  तिचा सोलापूर जिल्हयात प्रथम क्रमांक आला आहे. तसेच या परिक्षेत मौर्य निटवे यानेही सहभाग नोंदविला.

या दोघांचा ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची चे चेअरमन डॉ दत्तात्रय निटवे सर, सचिव डॉ. योगिता निटवे मॅडम, विद्यालयाचे प्राचार्य ताहेर शेख सर, उपप्राचार्य जिलानी आतार सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

ग्लोबल स्कूल च्या यशाबद्दल मोरोची व परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments