#Parbhani:मराठवाड्यातील जेष्ठ पत्रकार शेषेराव सोपने मामा,यांची पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा अध्यक्ष पदी निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -         
पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी, उत्कर्षांसाठी व न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन, उपोषण, निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून, या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कडून सोडवले आहेत.

*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी
*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा
*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना
*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे
*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे
*पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी
*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर, पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून, अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका बजावून, पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. 

शेषेराव सोपने मामा यांचा अल्प परिचय !
शेषेराव सोपने हे गेली अनेक वर्षे, पत्रकार म्हणून काम पहात असून, पत्रकारांच्या प्रश्नाची त्यांना चांगलीच जाणीव आहे.
शेषेराव सोपने हे परभणी जिल्ह्यातील,जनतेचा दरबार या युट्युब व पोर्टल चे संपादक असून, मराठवाडा मध्ये त्यांनी अनेक पत्रकार निर्माण केले आहेत. मराठवाडा मधील जेष्ठ पत्रकार म्हणून आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहेे, अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना चे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
पत्रकारांच्या अडचणीत ते नेहमीच धावून जातात. जेष्ठ व अभ्यासू  पत्रकार म्हणून,  मराठवाडा  मधील  पत्रकारांचे ते आधारवड असून, अभ्यासू संपादक म्हणून सर्वाना परिचित आहेत, पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा अध्यक्ष  म्हणून निवड करण्यात आली आहे, त्यांच्या निवडीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, प्रदेश सचिव डॉ आशिषकुमार सुना, राज्य उपाध्यक्ष किरण बाथम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ सरवदे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब करचे, संघटक शंकर माने, उपाध्यक्ष बळीराम पवार, ठाणे पालघर समन्वयक अरुण ठोंबरे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राम राठोड, परभणी जिल्हा सरचिटणीस प्रसाद पौळ, जालना जिल्हा अध्यक्ष डॉ निर्मल एस पी, सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार,  पुणे जिल्हा अध्यक्ष वाल्हेकर तसेच साप्ताहिक महादरबारचे संपादक हनुमंत माने  यांनी अभिनंदन करून, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम