#Natepute:गुरसाळे येथे महिला समितीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात



नियोजनपूर्वक मिरवणुकीने तालुक्यात भीम कन्यांचे कौतुक


महादरबार न्यूज नेटवर्क:-
गुरसाळे (बौद्धनगर) ता. माळशिरस येथे  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती महिला एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन करून मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली २८  एप्रिल रोजी सुरू झालेली जयंती उत्सव ३० एप्रिलला भव्य मिरवणुकीने डॉल्बीच्या दणदणाटात भीमसैनिकांच्या जल्लोषात जयंती ची सांगता झाली .


डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी महिला जयंती उत्सव समिती च्या वतीने  दि.२८ एप्रिल रोजी लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला २९ एप्रिल सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रमेश आढाव यांचे व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला व ३० एप्रिल रोजी सायंकाळी सात ते दहाच्या वेळेत सजवलेल्या रथामध्ये भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली डॉल्बीच्यॎ दणदणाटात भीमसैनिकांचा उत्साह ओसोंडून वाहत होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रिपाई चे ज्येष्ठ नेते एन के साळवे ,मातंग युवक संघटनेचे बाळासाहेब लांडगे, सम्यक सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव समीर सोरटे, रिपाईचे युवा नेते रोहित सोरटे, शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते अक्षय भांड, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर भैया सुळ - पाटील, सतीश वाघमारे, नाना गायकवाड या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा जयश्री झेंडे खजिनदार विद्या झेंडे मार्गदर्शक निर्मला भोसले कार्याध्यक्ष वैशाली झेंडे, उपाध्यक्ष सत्वशीला झेंडे,उषा भोसले,संगिता झेंडे,शोभा झेंडे,दिपाली झेंडे, शकुंतला झेंडे, सोनाली झेंडे, सुषमा झेंडे, कुसुम झेंडे, सीमा झेंडे, साधना झेंडे, सुनिता झेंडे, तसेच मेजर सत्यवान झेंडे, युवराज झेंडे, लखन झेंडे, मिथुन भोसले, आदिनाथ झेंडे, सचिन झेंडे, जालिंदर झेंडे, अमर झेंडे, अनंता झेंडे, शशिकांत झेंडे, विशाल झेंडे, संदीप झेंडे, दत्तात्रय झेंडे, सुनील झेंडे, मिथुन झेंडे, आधी उपस्थित होते मिरवणुकीत गुरसाळे सह आजूबाजूच्या गावातील भीम कन्या व भीमसैनिकांनी मोठे गर्दी केली होती.
  
अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक मिरवणुकीने जयंती उत्सव महिला समितीचे तालुक्यातील अनेक मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत