महादरबार न्यूज नेटवर्क -अक्षता हनमघर जागतिक परिचारिका दिना निमित्त यवत ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील परिचरिकांचा दौंड पत्रकार संघातर्फे शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामीण रुग्णालय वैदकीय अधीक्षक डॉ, बाळासाहेब कदम, डॉ,भूषण राक्षे , अधिपरिचरिका फरीन सयद, अंजली कदम, निलकमल कांबळे, हॉस्पिटल स्टाफ अंजुमन बागवान, अनुराधा जगताप, क्लार्क फुलचंद राख, कार्यलय अधिक्षक शहाणे, नायर, भुजबळ, भोसले , खराडे, भानुसे, जेष्ठ पत्रकार एम, जी, शेलार, राहुल अवचट, अनिल गायकवाड, मनोज खंडाले हे उपस्थित होते.
एम,जी, शेलार यांनी सर्व परिचारिका याचा सत्कार करून वैदकीय क्षेत्रातील दीपस्तंभ फ्लॉरेन्स नाइन्टिंगल यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. स्वागत डॉ कदम यांनी तर आभार फुलचंद राख यांनी मानले. आमच्या नोकरी कालावधीत परिचारिका दिनी असा सत्कार पहिल्यांदाच होतोय याचा आनंद वाटत असल्याचे बागवान यांनी नमूद केले.
0 Comments