#Yavat:सुनील लोणकर यांची पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या कोषाध्यक्षपदी निवड
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या कोषाध्यक्षपदी भिवरी (ता. पुरंदर) येथील सुनील पांडुरंग लोणकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. सासवड येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा कार्यकारणी विस्तार सभेत ही निवड झाली.
यावेळी शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे,राज्य नेते महादेव माळवदकर, राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, जिल्हाध्यक्ष सुनील वाघ, सरचिटणीस संदीप जगताप, इंदापूर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल, पुरंदर शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर, सरचिटणीस भाऊसाहेब बरकडे, शिक्षक नेते लतिफ इनामदार यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देऊन लोणकर यांना सन्मानित करण्यात आले. सुनील लोणकर हे पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभापती व पुरंदर तालुका शिक्षक समितीचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. शिक्षक हिताच्या प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे सुनील लोणकर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment