#Chiplun:मठाधिश भाईनाथजी महाराज यांच्या हस्ते जि.प.शाळा नं.2 धामणी येथे शैक्षणिक साहित्य वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
सोमवार दि.19 जुन 2023 रोजी संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे श्री.श्री.श्री. महंत पिर योगी भाईनाथजी महाराज,मठाधिश कालभैरव मठ पायधुनी मुंबई यांच्या वतीने  जि.प. शाळा.धामणी नं.2 गावातील सर्व शाळांमधील गरजू व होतकरू मुला-मुलीनां शैक्षणिक साहित्यांचे वाटत करण्यात आले. सुमारे  70 मुलांना दप्तर, ड्रेस,छत्री, वह्या,पेन, इत्यादी शैक्षणिक साहित्यांचे वाटत केले गेले.

सदर कार्यक्रमाला स्वामीभक्त श्री प्रभाकर घाणेकर, सरपंच श्री संतोष काणेकर, उपसरपंच श्री संगम पवार, शिक्षण विस्तार अधिकारी श्री विनायक पाध्ये,माजी पोलीस पाटील श्री हरिश्चंद्र गुरव,ग्राम.पं.सदस्य ,श्री गौतम गमरे,शा.व्य.स.अध्यक्ष, केंद्रप्रमुख,शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.  तसेच कार्यक्रम श्री प्रभाकरशेठ यांच्या प्रेरणेतून आणि प्रयत्नातुन गेली 14 वर्षे अखंडपणे चालू आहे. सामाजिक सेवेचे व्रत अंगीकारलेले भाईनाथजी महाराज दरवर्षी आपल्या कोकणातील सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी,रुग्ण, मुलभूत सोईसुविधांपासून वंचित, गोरगरीब जनतेला फार मोठं आर्थिक योगदान देत असतात. कार्यक्रमाला भाईनाथजी महाराज यांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गुरव गुरूजी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम