#Natepute:मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमीत्त शालेय विद्यार्थी यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क -
माढा लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी हिंदु जननायक मराठी हृदय सम्राट राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज जिल्हा परीषद प्राथमिक शाळा पिंपरी व कर्चेवाडी येथील शाळांना वह्या पेन बीस्कीटे वाटप केले .


त्यावेळी पिंपरी गावचे युवा सरपंच अविनाश कर्चे मा सरपंच व विद्यमान सदस्य दादासो कर्चे, मा सदस्य सागर कर्चे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष पै शंकर कर्चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, मनसे तालुका सचीव लक्ष्मण नरुटे, मनसे तालुका उपाध्यक्ष रोहीत खाडे, महीला आघाडी तालुका अध्यक्ष मंगल ताई चव्हाण,मनसे नातेपुते प्रसीद्धी प्रमुख दादा भांड  इ. मान्यवर मंडळी उपस्थीत होते.


या वेळी बोलताना रोहीत खाडे यांनी सांगीतले दर वर्षी हजारो मुलांना आम्ही वेगवेगळ्या गावात जाऊन हा उपक्रम माढा लोकसभा अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून व सहकार्यने साजरा करतो. खरोखर माझी मराठी शाळा जगली पाहिजे वाचली पाहीजे आणी त्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करावे लागेल. लवकरच आम्ही येणाऱ्या काळात मनसे चा कामाचा ठसा नागरीकांच्या मनावर उमठवू व राजसाहेबांन सांगीतल्या प्रमाणे जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम