#Yavat:खडकावर नंदनवन फुलवुन प्रसन्न विध्येचे मंदिर साकारणाऱ्या आदर्श शिक्षक दाम्पत्याचा निरोप समारंभ


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत येथील माणकोबावाडी येथील शाळेत दि. (०८ )रोजी माणकोबावाडी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने या शाळेतील मा. शिक्षक  सुरेश मेमाणे व लिलाबाई खेडेकर यांची बदली झाल्यामुळे त्यांचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्याबरोबरच या शाळेत नवीन रुजू झालेले शिक्षक लांडगे सर व साळवे सर यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला.


गेली १७ वर्ष ज्यांनी या शाळेत अविरत सेवा करून उघड्या माळावरील शाळेला आयएसओ मानांकन मिळवुन दिले असे हे शिक्षक दाम्पत्य सुरेश मेमाणे व लिलाबाई खेडेकर यांनी जेव्हा १७ वर्षापूर्वी येथील शाळेत आले तेव्हा हि शाळा फक्त एका खडकावर दोन वर्गखोली च्या स्वरुपात उन्हाच्या झळा सोसत उभी होती. परंतु हे शिक्षक जेव्हा येथे आले तेव्हा त्यांनी या शाळेचा कायापालट करण्याचा मानस मनात पक्का केला आणि लोकांच्या मनात जागा निर्माण करून शिक्षणाबरोबर पर्यावरण व शुशोभिकरण हि गोष्ट मनात ठेवुन येथे झाडे लावण्याचा प्रयत्न केला एक एक झाड करत येथे असंख्य झाडे मोठी करून एक हरित शाळा निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी साकार केले. आणि त्याबरोबर मुलांच्या शिक्षणाची प्रगती यामध्ये हि कसूर न ठेवता १ ली ते ४ थी पर्यंत ची मुले अभ्यास, इंग्रजी मराठी वाचन, गणित आणि पाढे यामध्ये अव्वल ठरावी अशी गुणवत्ता त्यांच्या अंगी निर्माण केली.

आज शाळेची गुणवत्ता, नैसर्गिक शुशोभीकरण, डिजिटल शाळा, रंगीत भिंत, शाळेला नवी इमारत, शाळेतच पाण्याची सोय, कार्यक्रमासाठी व्यासपीठ अशा एक ना अनेक संकल्पना राबवून शाळेचा सर्वांगीण विकास माणकोबावाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने या शिक्षक दाम्पत्याने घडवून आणला. आणि एक आदर्श शाळा म्हणुन आज या शाळेचा नावलौकिक पंचक्रोशीत होत आहे. याचे सर्व श्रेय या शिक्षक दाम्पत्यांना जाते.

आजच्या या निरोप समारंभ कार्यक्रमामध्ये शाळा व्यवस्थापन समिती व माणकोबावाडी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते मा. शिक्षक सुरेश मेमाणे व लिलाबाई खेडेकर या दाम्पत्याचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. त्याबरोबरच या शाळेत रुजू झालेले शिक्षक साळवे सर व लांडगे सर यांचेही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात राहुल बिचकुले, पोपट लकडे, सोमनाथ खुपसे, मनोहर खताळ यांनी मनोगत व्यक्त केले. साळवे सर व लांडगे सर यांनीही आपला परिचय उपस्थित मान्यवरांना करून दिला. आणि सुरेश मेमाणे सर यांनी उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ते बोलत असताना उपस्थित सर्वच ग्रामस्थ व ते स्वतः भावूक झाले होते.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर खताळ, सामाजिक कार्यकर्ते मारुती बिचकुले, धुळा भिसे, मल्हारी बिचकुले, सतीश लकडे, दिपक दोरगे, लहू लकडे,  सुभाष बिचकुले, संपत भिसे, राजु बिचकुले, आंबूराव कोळपे, प्रकाश भिसे, दत्तात्रय पिंगळे, बाप्पू लकडे, संदीप शिंदे व माणकोबावाडी ग्रामस्थ व विद्यार्थी  हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम