महादरबार न्यूज नेटवर्क - भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालूका अध्यक्षपदी मामासाहेब पांढरे यांची निवड करण्यात आली आहे.ते मोहीते पाटील समर्थक म्हणून ओळखले जातात.या निवडीबद्दल येथे मोठ्या प्रमाणात चौकात फटाक्याची आतेषबाजी करण्यात येऊन आनंदोत्सुव साजरा करण्यात आला. त्यांच्या मागे तरूंणाचे वलय असून त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांची निवड करण्यात आली असून सध्या ते मार्केट कमिटी उपसभापती पदावर काम करीत आहेत.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी त्यांच्या निवडीचे पञ दिले असून भारतीय जनता पार्टीच्या अंत्योदय करण्याचा विचार घेऊन आगामी काळामध्ये जनसामान्यामध्ये जाऊन सर्वाना बरोबर घेऊन पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक बांधणीसाठी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष मामासाहेब पांढरे यांनी सांगितले.
या निवडीबद्दल माजी उपमूख्यमंञी विजयसिह मोहिते पाटील,आ.रणजितसिंह मोहीते पाटील,आ.राम सातपूते,धैर्यशील मोहिते पाटील,बाबाराजे देशमूख.यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments