Hot Posts

6/recent/ticker-posts

#Mumbai:ॲड. सचिन जोरे यांचा प्रजासत्ताकदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश


महादरबार न्यूज नेटवर्क -
शिवसेना शिंदे गटाचे नेते ॲड. सचिन जोरे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशाच्या वेळेस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश सरचिटणीस रविकांत राठोड राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲड. सचिन जोरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिव पदी निवड करण्यात आली आहे. ॲड. सचिन जोरे यांनी 2019 मध्ये माढा लोकसभा निवडणूक लढवली होती.

यावेळी ॲड. सचिन जोरे बोलताना म्हणाले शरदचंद्रजी पवार यांच्या विचारानुसार युवकांचे संघटन वाढवण्यासाठी काम करणार आहे. लोकांसाठी अनेक प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार आहेत. तरुणांना रोजगार मेळावा यासाठी प्रयत्न करणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं वर्चस्व आहे. मागील अनेक दिवसांपासून स्थानिक पातळीपर्यंत विस्तारण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जातोय. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीमध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग सुरु झाली आहे. आज माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला, फलटण, माण या भागातील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला.  या पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक कार्यकर्ते तसेच माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

बातमी चौकट :
शरद पवार साहेब पाच दशकांहून अधिक काळ झटलेले आहेत. नेते बनवण्याची फॅक्ट्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. सध्याच्या राजकरणात सूडाच व द्वेषाचं राजकारण सुरु आहे, हुकूमशाही पद्धतीनं सरकार चालवणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात आपल्याला लोकशाही मार्गाने लढून मा. शरद पवार साहेबांचे व मा. जयंत पाटील साहेबांचे हात बळकट करायचं आहे.

- ॲड. सचिन जोरे
सचिव - राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य

Post a Comment

0 Comments