#Mumbai:माखजन इंग्लिश स्कूलच्या 'स्पंदन' 2000- 2001 माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मुंबई येथे उत्साहात संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल, माखजन शाळेतील स्पंदन-2000-2001  माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर नुकताच मुंबई येथे संपन्न झाला. सुरूवातीला सर्वांचे  गुलाब पुष्प  देवुन स्वागत करण्यात आले. सकाळी चहा नाष्टा झाल्यावर  विविध  मनोरंजन आणि गेम्स व प्रत्येकाची ओळख विविध क्षेत्रात काम करत असलेले उपलब्ध होणारे संधी यांची माहिती तसेच  शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात उपलब्ध होणारी संधीच्या बाबतीत मार्गदर्शन करण्याच्या सुचना करण्यात आल्या. पुढील काळी शाळेच्या उपक्रमासाठी फंड्स  जमा करणे आणि शाळेच्या हस्तलिखित डिजिटल स्वरुपात मिळण्यासाठी आपण सर्वानीच  सहकार्य करावे याबद्दल चर्चा करण्यात आली. दुपारी सर्वजणा सोबत एकत्र स्नेह- भोजन करण्यात आले.एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत सध्या कोण काय करतोय यावर शालेय सवंगड्यांनी गप्पाटप्पा मारल्या.
माखजन इंग्लिश स्कूलने आजवर त्यांच्या विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान देऊन व सर्वगुणसंपन्न शिक्षण व संस्कार दिल्याने आज या शाळेतील विद्यार्थी मोठमोठ्या पदावर काम करत आहेत त्यामधील शाळेतच शिक्षण झालेले माजी विद्यार्थ्यी म्हणजेच आमच्या स्पंदन मधील  त्याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत कोणी  पत्रकार क्षेत्रात, स्वतंत्र व्यवसाय, स्वतःचे कोचिंग क्लासेस असे विविध ठिकाणी संस्थेमध्ये काम करतआहेत. ठाणे , गुहागर,रत्नागिरी सारख्या ठिकाणी शहरात जाऊन अर्थार्जन करत आहेत. तर काहीजण गावाकडेच राहून उदरनिर्वाह करत आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या बालपणाच्या सवंगड्यांना एकत्र आणून पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी पल्लवी तांबे,अमोल चव्हाण, वैशाली हेमण,दयानंद जोगले,  प्रसन्न लघाटे, भुषण भुवड, भुषण पाटकर ,अमिता पाटणकर यांनी पुढाकार घेतला आणि तो प्रत्यक्षात आणत 2000-2001 बॅचच्या विद्यार्थ्यांचा गेट टूगेदर मुंबई येथे घडवून आणला. हा गेटटुगेदर दि. 28 जानेवारी रोजी स्टुडंट्स अकॅडमी ओरँकल टूटोरिअल्स ,ग्रॅण्टरोड येथे संपन्न झाला.
    
सदर 2000-2001 सालातील बॅचच्या विद्यार्थ्यांनी मिळून एक सामाजिक ग्रुप तयार केला आहे. या ग्रुप मार्फत सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी हुशार व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. तसेच या ग्रुपमध्ये काही आपत्कालीन समस्या निर्माण झाली तर त्यासाठी  स्पंदन मार्फत फंडाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
     
या गेट टूगेदर कार्यक्रमास सुधाकर हेमण, रविंद्र किंजळकर , नरेश राऊत, संजय सुवरे, उमेश पवार ,सोनाली देवरूखकर, ओमकार नामजोशी, संदीप पवार, विलास गुरव, हर्षदा पेंडसे,निलेश गर्दे, शैलेश गर्दे  , महेंद्र रपसे, अमित आंबवकर , विकास महाकाळ ,मनोहर वाडेकर,मनिषा मुक्शे,तारीणी शिंदे , रुपाली चव्हाण,  तरन्नुम डिंगणकर, अनया कुलकर्णी, सरस्वती पवार, श्रध्दा कोकाटे, मंगल गोरीवले,सुपर्णा सुर्वे, प्रणिता शीतप,मीना मुदगल,राजेश गुरव,माया केळकर, सुरेखा डिंगणकर ,संतोष मांडवकर आदि माजी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता अमोल चव्हाण यांनी खास मित्र मैत्रिणीं करीता गाणे गायले "मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा" हे गाणे ऐकून एक सेकंद का होईना प्रत्येकांचे डोळे पाणावले होते.सर्वांना एकच वाटत होते आजचा दिवस पुन्हा  कधी येईल. पुढील वर्षी एकदा परत एकत्र येऊन स्नेहमेळावा अत्यंत उत्साहाने साजरा करू  असं एकमताने ठरविण्यात आले.ओमकार नामजोशी यांनी आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम